पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Mutual funds मध्ये एकरकमी गुंतवणूक करावी की महिन्याच्या महिन्याला SIP केलेली चांगली?

इमेज
इक्विटी मार्केट मध्ये गुंतवणुकीची सुरुवात करत असाल तर महिन्याच्या महिन्याला ठराविक रक्कम SIP च्या माध्यमातून गुंतवलेली चांगली. कारण शॉर्ट टर्म मध्ये मार्केट्स अचानक खाली जाऊ शकतात आणि मोठी रक्कम गुंतवलेली असेल तर अशी अस्थिरता तुमची रात्रीची झोप उडवू शकते. अशा वेळी गुंतवलेली रक्कम काढल्याने नुकसान होतेच पण स्टॉक मार्केट बद्दल मनात भीती बसू शकते. SIP केल्याने मार्केट खाली जरी गेले तरी अशा वेळी उलट स्वस्त युनिट्स मिळतात. SIP लॉन्ग टर्म उद्दिष्टे मनात ठेऊन चालू केलेली असल्या कारणाने अशा अस्थिरतेच्या काळात गुंतवणूक चालूच ठेवणे तुलनेने सोपे पडते. जर मोठी रक्कम गुंतवायचीच असेल आणि अस्थिरतेचा त्रासही करून घ्यायचा नसेल तर STP (सिस्टमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन) चा पर्याय असतो. यात तुम्ही एकरकमी गुंतवणूक एखाद्या लिक्विड फंडात करून तिथून दर महिना ठराविक रक्कम इक्विटी फंडात ट्रान्स्फर करू शकता. मुच्युयल फंडांचा थोडाफार अनुभव असेल किंवा चांगला सल्लागार असेल तर त्यांच्या मदतीने बॅलन्स्ड ऍडव्हान्टेज फंड्स हा देखील एकरकमी गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. या फंडामध्ये नावाप्रमाणेच डेट आणि इक्विटी अशा दोन्ही गु...

कॅलिफोर्निया गोल्ड रश आणि स्टॉक मार्केट क्लासेस

इमेज
शेअर बाजारातील तज्ज्ञ मंडळी स्वत: जर मार्केटमधून भरपूर पैसे मिळवत असतील तर ते प्रशिक्षण अभ्यासक्रम (ट्रेनिंग कोर्स) का काढतात? त्यांच्या वर्गामध्ये शिकलो तरी आपले मात्र नुकसान कसे काय होते? एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत कॅलिफोर्निया प्रांतात सोन्याचे साठे सापडले आणि हे सोने काढण्यासाठी, अल्पावधीत नफा कमवू पाहणाऱ्या स्वप्नाळू लोकांची संपूर्ण अमेरिकेतून तिथे झुंबड उडाली. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर खाणकाम चालू केल्यावर साहजिकच त्यातल्या काही लोकांचे नशीब उजळले आणि काही लोक तसेच खड्डे खणत बसले. इतिहासात हा कालखंड "गोल्ड रश" म्हणून ओळखला जातो. खड्डे खणून, माती चाळणारे सगळे श्रीमंत नाही झाले. मात्र या झुंबडीला काही चाणाक्ष लोक कुदळ, फावडे, घमेली, जीन्स विकत होते. ते मात्र हमखास श्रीमंत झाले. चित्र  विकिपीडिया  वरून साभार ---- भारतात दरवर्षी हजाराहून कमी क्लास १ पोस्ट भरल्या जातात. त्या हजार एक पोस्टच्या जागांसाठी दर वर्षी २०-४० लाखाहून अधिक मुले/मुली लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करतात. त्यातले लाखो जण पाण्यासारखा पैसा खर्च करून दिल्ली, कोटा अशा शहरात क्लास लावतात...

बिटकॉइन काय भानगड आहे?

इमेज
बिटकॉइन अलिकडे इतके प्रसिद्ध का झाले? बिटकॉइन ला अलीकडे महत्व का आले आहे हे समजून घ्यायचे असेल तर पहिल्यांदा सम्पत्ती म्हणजे काय, आणि चलन म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल. बिटकॉइन मागचे तंत्रज्ञान तूर्तास बाजूला ठेवू. तसेही ते आपल्याला एका बैठकीत समजणार नाहीये. त्याच्यावर सेपरेट पोस्ट करूया. ---- चला सुरुवात करू एका प्रश्नाने. कंटाळा करू नका. किमान २-५ मिनिटे विचार करून डोक्यात उत्तर तयार करा आणि मग पुढे निघा. प्रश्न - पृथ्वीवर तयार होणाऱ्या संपत्तीचे स्रोत किती व कोणते? . १ मि. . २ मि. . ३ मि. झाला विचार करून? मी पण केला होता. उत्तर - पृथ्वीवर तयार होणाऱ्या संपत्तीचे स्रोत तीन. सूर्य, भूमी, महासागर. या तीन गोष्टींमधूनच पृथ्वीवर नवीन संसाधने तयार होतात. आणि संसाधने म्हणजेच संपत्ती. म्हणजे सूर्यापासून, भूमीतून आणि महासागरातून ( शेती, खनिज, मासे, इ.) उत्त्पन्न घेणारेच फक्त संपत्ती तयार करत आहेत. ऑ.. मग आम्ही दिवसभर ऑफिसमध्ये, फॅक्टरीमध्ये राबून काय तयार करतो? तुमच्या डोक्यात आणखी कितीही गोष्टी आल्या असल्या तरी त्या सर्वांचा स्रोत या तीन पैकीच असणार आहे. बाकी सबकुछ फक्त एकाकडे असलेली संपत...

पॉन्झी स्कीमचे वास्तव

इमेज
तुम्ही कोणता सर्वात मोलाचा आर्थिक सल्ला देऊ शकता? ​नेटफ्लिक्स वर "मॅडॉफ" नावाची डॉक्युमेंट्री आहे. अमेरिकेत बर्नी मॅडॉफ नावाच्या एका इंवेस्टमेंट बँकर ने २५-३० वर्षे एक हेज फंड चालवला जो नियमितपणे त्याच्या गुंतवणूकदारांना १५-२० टक्के परतावा देत होता. २००८ मध्ये या इसमाने स्वतः सरकारी एजन्सीस समोर समर्पण करून सांगितले की इतकी वर्ष तो एक पाँझी स्कीम चालवत होता. म्हणजे गुंतवणुक दारांच्या पैशाची गुंतवणूक कधी झालीच नाही. नवीन आलेल्या पैशाने जुन्या गुंतवणूकदारांना परतावा दिला जात होता. या माणसाने हुशार लोकांना पदरी ठेवून सगळे नियम व्यवस्थित मॅनेज केले. त्याच्या माणसांनी अशी सॉफ्टवेअर बनवली होती जे शेयर्स चे महिनाभरापूर्वीचे भाव निवडून त्याला पाहिजे तसे रिटर्न देणारे ट्रेड कागदावर छापून द्यायचे. त्यामुळे ज्यावेळी स्कृटीनी आल्या त्यावेळी याने सगळे कागद तंतोतंत जुळवले. असा हा सगळा खेळ त्याने तब्बल २५-३० वर्ष चालवला. काही मोठ्या गुंतवणूकदारांना तर या गोष्टीची पूर्ण कल्पना होती. तरीही "जब तक गंगा बह रही है, हाथ धोलो" या न्यायाने त्यांनी देखील कोट्यवधी डॉलर्स कमावले. शेवटी २००८ ...

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीची सुरुवात

इमेज
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची असेल, तर कमीत कमी किती रक्कमेपासून सुरूवात करावी लागते? आणि ती कशी करायची, या बद्दल मराठी कोरावरील कोणी जाणकार मार्गदर्शन करू शकतील का? मी स्वतः एक गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर आहे. "म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करणे सोपे आहे", "डायरेक्ट ऍप वगैरे वापरून करू शकता" या गोष्टी ज्यांना या विषयाची आधीपासूनच जाण आहे अशा लोकांना सोप्या वाटतात. माझ्या मते जर सुरुवातच करायची असेल तर चांगला मार्गदर्शक बघून करावी. कारण एखाद्या बँकेत एफडी करून दर वर्षी ७ ते ८% व्याज मिळवण्याइतकी इक्विटी मार्केट्स मध्ये गुंतवणूक सोपी नाही. मला विचाराल तर गुंतवणूक ही आर्थिक बाजूबरोबरच एक मानसिक गोष्ट देखील आहे. ---- गेल्या वर्ष दीड वर्षात ९५% म्युच्युअल फंड्स चा परतावा एफ डी पेक्षा कितीतरी कमी आहे आणि काहींच्या बाबतीत तर मायनस मध्ये गेलेला आहे. अशा वेळी आधीच्या वर्षी मिळालेले १२-१५ टक्के परताव्याचे आकडे बघून गुंतवणूक करणारे, जर कोणी मार्गदर्शक नसेल, तर आपापली गुंतवणूक काढून घेतात किंवा नुकसान सोसून सरळ एफडी चा मार्ग शोधतात. यात चूक बरोबर काह...

मुलांच्या शिक्षणाची तरतूद

इमेज
मला माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी 5 वर्षानंतर 50,00,000 पन्नास लाख रुपये लागतील आत्ता माझ्याकडे 1,00,000 एक लाख आहेत, कशा प्रकारे गुंतवणूक केल्यावर 5 वर्षात 50,00,000 तयार होतील? १ लाखाचे ५ वर्षात ५० लाख करायचे असतील तर रेट ऑफ रिटर्न किती हवा ते पाहू. तसे पाहिले तर तुमचे पैसे दर वर्षी दुप्पट झाले तरी, म्हणजे १००% व्याजाने वाढले तरी - ० सुरवात - १ लाख १ वर्षानंतर - २ लाख २ वर्षानंतर - ४ लाख ३ वर्षानंतर - ८ लाख ४ वर्षानंतर - १६ लाख ५ वर्षानंतर - ३२ लाख ३२ लाखच होऊ शकतात. आणि सलग ५ वर्षे १०० टक्के परतावा मिळेल अशी गुंतवणूक एकतर अस्तित्वात नसेल किंवा असली तरी तुम्हाला ती उपलब्ध असेल याची शक्यता फार कमी. ---- आता सूत्र लावून शोधू कि परतावा किती पाहिजे? चक्रवाढ पद्धतीने (वर्षाच्या शेवटी जमा होणारे) व्याज मिळाले तर शेवटी किती रक्कम मिळेल याचे सूत्र तयार झालेली रक्कम = मुद्दल * (१ + व्याजाचा दर) ^ कालावधी व्याजाचा दर = { (तयार झालेली रक्कम / मुद्दल) ^ (१ / कालावधी) - १ } व्याजाचा दर = { (५० लाख / १ लाख) ^ (१ / ५) - १} या हिशोबाने हा दर येतो ११८ टक्के. म्हणजे दर वर्षी तुमचे पैसे दुपटीहून जास्त ...

निवृत्त होण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतील हे कसे ठरवायचे?

इमेज
निवृत्त होण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतील हे कसे ठरवायचे? याचे उत्तर काढण्यासाठी काही ठोकताळे लावू शकता किंवा अगदी शास्त्रोक्त पद्धतीने देखील उत्तर मिळू शकते. आपण सूत्रांच्या आधारे आकडेमोडच करूया. एक उदाहरण घेऊ. शशी आज ३५ वर्षाचा आहे. त्याची पत्नी सोनल ३२ वर्षाची आहे. या दाम्पत्याला शशीच्या ५५ व्या वर्षी निवृत्त व्हायचे आहे. त्याला बायकोसोबत निवृत्त जीवन जगायचे असेल तर महिन्याचे ४० हजार आजच्या घडीला पुरेसे वाटतायेत. वार्षिक महागाई वाढीचा दर ६% पकडला. २० वर्षानंतर आजच्या ४० हजारा एवढी रक्कम किती असेल ते पहिले काढूया. २० वर्षानंतर महिन्याला लागणारी रक्कम = ४००००*(१ + महागाई वाढीचा दर ) ^ निवृत्तीसाठी राहिलेली वर्षे २० वर्षानंतर महिन्याला लागणारी रक्कम = ४००००*(१ + ६% ) ^ २० २० वर्षानंतर महिन्याला लागणारी रक्कम = १,२८,२८५ म्हणजे आज जे ४० हजारांमध्ये घर चालू शकते असे शशी-सोनल ला वाटते, तोच संसार चालवायला २० वर्षांनी शशी आणि सोनल ला १ लाख २८ हजार रुपये लागणार आहेत. ---- आता दुसर्या पायरीकडे वळूया. २० वर्षांनी शशी-सोनल ला दरमहा १ लाख २८ हजार रुपये लागणार असतील, तर त्यांच्याकडे त्यावेळी कि...

इन्शुरन्स श्रेष्ठ दान

इमेज
आपले पैसे दान करण्यासाठी सर्वात चांगला मार्ग कोणता? माझ्यामते दान करण्याचा सर्वात चांगला मार्ग स्वतःचा आणि कुटुंबाचा इन्शुरन्स काढणे. हे उत्तर अपेक्षित नसले तरी पूर्ण वाचा हि विनंती. आपण दान का करतो? एखाद्या गरजवंताला मदत व्हावी, एखाद्या चांगल्या कामाला आपला हातभार लागावा आणि कितीही नाही म्हंटले तरी पुण्य कमावण्यासाठी. नाहीका? मला वाटते इन्शुरन्सचा देखील हाच उद्देश आहे. फरक एवढाच आहे कि ज्या गरजवंताला आपण मदत करतो, भविष्यात तोच गरजवंत आपण वा आपले कुटुंबही असू शकतो. इन्शुरन्स काय आहे, हे सोप्या पद्धतीने समजून घेऊ. एका गावात १०० घरे आहेत. प्रत्येक घर जवळजवळ सारख्याच पद्धतीचे आहे आणि आतल्या सामानासहित एकूण एक लाख रुपयांचे आहे. मागील काही दशकांपासूनचा इतिहास पाहिला तर दर वर्षी या गावातील कुठलीही २ घरे आगीमुळे किंवा वादळाच्या तडाख्यात नष्ट होतात. नष्ट झालेली घरे पुन्हा बांधायला त्या २ दुर्देवी कुटुंबाना १ लाख रुपये खर्च येतो. म्हणजे एकूण २ लाख रुपये लागतात. त्या कुटुंबांचे आर्थिक गणित पुढील काही वर्षांसाठी बिघडून जाते. हे असे वर्षानुवर्षे घडत आहे. त्या गावातील काही हुशार मंडळींनी यावर इन्श...