मुलांच्या शिक्षणाची तरतूद
मला माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी 5 वर्षानंतर 50,00,000 पन्नास लाख रुपये लागतील आत्ता माझ्याकडे 1,00,000 एक लाख आहेत, कशा प्रकारे गुंतवणूक केल्यावर 5 वर्षात 50,00,000 तयार होतील?

१ लाखाचे ५ वर्षात ५० लाख करायचे असतील तर रेट ऑफ रिटर्न किती हवा ते पाहू.
तसे पाहिले तर तुमचे पैसे दर वर्षी दुप्पट झाले तरी, म्हणजे १००% व्याजाने वाढले तरी -
० सुरवात - १ लाख
१ वर्षानंतर - २ लाख
२ वर्षानंतर - ४ लाख
३ वर्षानंतर - ८ लाख
४ वर्षानंतर - १६ लाख
५ वर्षानंतर - ३२ लाख
३२ लाखच होऊ शकतात. आणि सलग ५ वर्षे १०० टक्के परतावा मिळेल अशी गुंतवणूक एकतर अस्तित्वात नसेल किंवा असली तरी तुम्हाला ती उपलब्ध असेल याची शक्यता फार कमी.
आता सूत्र लावून शोधू कि परतावा किती पाहिजे?
चक्रवाढ पद्धतीने (वर्षाच्या शेवटी जमा होणारे) व्याज मिळाले तर शेवटी किती रक्कम मिळेल याचे सूत्र
तयार झालेली रक्कम = मुद्दल * (१ + व्याजाचा दर) ^ कालावधी
व्याजाचा दर = { (तयार झालेली रक्कम / मुद्दल) ^ (१ / कालावधी) - १ }
व्याजाचा दर = { (५० लाख / १ लाख) ^ (१ / ५) - १}
या हिशोबाने हा दर येतो ११८ टक्के.
म्हणजे दर वर्षी तुमचे पैसे दुपटीहून जास्त वाढले पाहिजेत.
बँकेच्या एफडी चा व्याज दर ८ टक्के पकडला आणि एखादा सलग ५ वर्षे २० टक्के वार्षिक परतावा देणारा म्युच्युअल फंड जरी नशिबाने वाट्याला आला तरी १ लाखाचे किती होतात ते पाहू -
बँक एफ डी ५ वर्षे, ८ टक्के : १ लाख * (१ + ८%) ^ ५ = १ लाख ४७ हजार
सरासरीपेक्षा वरचा परतावा देणारा म्युच्युअल फंड - ५ वर्षे, २० टक्के
१ लाख * (१ + २०%) ^ ५ = २ लाख ४९ हजार
म्हणजे तुम्ही जे लक्ष्य ठेवले आहे ते खूपच अतिरंजित आहे.
लक्ष्य अतिरंजित आहे तर काय सोडून द्यायचे? नाही. तुमच्याकडे एक सूत्र आहे त्याचे घटक (parameters) बदला. एकतर तुमची मुद्दल एक लाखापेक्षा जास्त करा, दरवर्षी नवीन मुद्दलाची सोय करा, किंवा गुंतवणुकीचा कालावधी वाढवा.
सरासरी १२ टक्के परतावा देणाऱ्या एखादा फंड निवडला तर काय होते पहा -

१ लाखाचे वार्षिक १२ टक्के दराने ५० लाख करायचे असतील तर साडेचौतीस वर्षे दिली पाहिजेत. आणि ५ वर्षातच ५० लाख पाहिजे असतील तर आधीच साडेअठ्ठावीस लाख गुंतवले पाहिजेत.
१२% परतावा पाहिजे असेल तर थोडी जोखीम आहे. अगदीच निर्धोक परतावा पाहिजे असेल तर एखाद्या ८ टक्के वार्षिक व्याज देणाऱ्या पोस्ट ऑफिस स्कीम मध्ये गुंतवणूक केली तर गणित खालीलप्रमाणे बदलते.

आता तुम्ही म्हणाल कि हे तर अगदीच हाताबाहेर गेले. त्यामुळेच गुंतवणुकीचा काळ महत्वाचा आहे.
आता समजा तुम्ही ५ वर्षे, १० वर्षे, १५ वर्षे आधीच हे लक्ष्य ठेवले असते तर काळ जास्त असल्यामुळे १२% परताव्याची अपेक्षा अगदीच अशक्य नव्हती आणि गुंतवणूक वाढण्यासाठी कालावधी पण चांगला मिळाला असता.

म्हणजे मुलीच्या जन्माच्या वेळीच सव्वापाच लाख एकरकमी गुंतवले असते तर तिच्या उच्चशिक्षणाच्या वेळेपर्यंत ५० लाख तयार झाले असते.
एकरकमी एवढे कुठून आणायचे? इथे पद्धतशीर गुंतवणूक केली तर हे फुगलेले आकडे कसे आवाक्यात येऊ शकतात हे पाहू.

यावरून असे कळते की ज्यांची मुलगी या वर्षीच जन्माला आली आहे त्यांनी ५००० रुपये प्रति महिना गुंतवणूक केली तर २० वर्षांनी ५० लाख हातात असू शकतात. जसे जसे गुंतवणूक कालावधी कमी होतो, SIP ची रक्कम वाढणार. म्हणजे ज्यांची मुलगी ५ वर्षाची आहे त्यांना तिच्या २० व्या वर्षी ५० लाख मिळण्यासाठी सरळ सरळ दुप्पट म्हणजे १० हजार प्रति माह गुंतवणूक करायला हवी
आता तुमच्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया. वरील सारणी मधली शेवटची ओळ पहा. तुमचा गुंतवणुकीचा कालावधी ५ वर्षे आहे. आणि तुम्हाला हे पैसे त्या वेळी पाहिजेच आहेत. अशा केस मध्ये तुम्ही ८% शाश्वत परताव्याचीच अपेक्षा धरायला हवी. त्यामुळे तुम्हाला पुढील पाच वर्षे सहासष्ट हजार रुपये महिना म्हणजे वार्षिक जवळ जवळ ८ लाख रुपये बाजूला काढले पाहिजेत तेव्हा तुमचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते. नाहीतर तेवढ्या किमतिचे घर किंवा जमीन तरी तयार ठेवा. किंवा एखादा ढिंकचाक व्यवसाय जो तुमचे भांडवलावर दुपटीहून जास्त परतावा देत आहे तो करा.
तळटीप: आज कोणाला शिक्षणासाठी ५० लाख पाहिजे असतील तर त्याच शिक्षणासाठी ६% महागाई दर पकडून २० वर्षांनी १ कोटी ६० लाख खर्च अपेक्षित आहे. भीतीदायक आहे पण सत्य आहे.
वरील आकड्यांची शहानिशा करायची असेल तर इथून करू शकता -
SIP Calculator - Calculate Returns
काही विसंगती आढळल्यास कमेंट मध्ये सांगा. आणखी काही प्रश्न असतील तर माझ्या प्रोफाइल वर जाऊन दिलेल्या माहितीद्वारे संपर्क करू शकता. नो प्रोब्लेम :).

----

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा