Mutual funds मध्ये एकरकमी गुंतवणूक करावी की महिन्याच्या महिन्याला SIP केलेली चांगली?
इक्विटी मार्केट मध्ये गुंतवणुकीची सुरुवात करत असाल तर महिन्याच्या महिन्याला ठराविक रक्कम SIP च्या माध्यमातून गुंतवलेली चांगली. कारण शॉर्ट टर्म मध्ये मार्केट्स अचानक खाली जाऊ शकतात आणि मोठी रक्कम गुंतवलेली असेल तर अशी अस्थिरता तुमची रात्रीची झोप उडवू शकते. अशा वेळी गुंतवलेली रक्कम काढल्याने नुकसान होतेच पण स्टॉक मार्केट बद्दल मनात भीती बसू शकते.
SIP केल्याने मार्केट खाली जरी गेले तरी अशा वेळी उलट स्वस्त युनिट्स मिळतात. SIP लॉन्ग टर्म उद्दिष्टे मनात ठेऊन चालू केलेली असल्या कारणाने अशा अस्थिरतेच्या काळात गुंतवणूक चालूच ठेवणे तुलनेने सोपे पडते.
जर मोठी रक्कम गुंतवायचीच असेल आणि अस्थिरतेचा त्रासही करून घ्यायचा नसेल तर STP (सिस्टमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन) चा पर्याय असतो. यात तुम्ही एकरकमी गुंतवणूक एखाद्या लिक्विड फंडात करून तिथून दर महिना ठराविक रक्कम इक्विटी फंडात ट्रान्स्फर करू शकता.
मुच्युयल फंडांचा थोडाफार अनुभव असेल किंवा चांगला सल्लागार असेल तर त्यांच्या मदतीने बॅलन्स्ड ऍडव्हान्टेज फंड्स हा देखील एकरकमी गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. या फंडामध्ये नावाप्रमाणेच डेट आणि इक्विटी अशा दोन्ही गुंतवणुकीचे मिश्रण असते आणि हे फंड्स तुलनेने कमी अस्थिर असतात. त्यामुळे सरसकट एकरकमी गुंतवणूक करायचीच असेल आणि जास्त जोखीम नको असेल तर बॅलन्स्ड ऍडव्हान्टेज फंड्स चा विचार करावा.
अर्थात कोणती स्ट्रॅटेजी जास्त चांगले रिटर्न्स देईल हे तर तुम्ही कोणत्या काळात गुंतवणूक करत आहात यावर अवलंबून आहे.
खालील प्रकारे काही गृहीतके धरून एकरकमी, SIP किंवा STP यांचे मिश्रण करून किती परतावा मिळू शकेल याचा अंदाज लावता येतो.

गुंतवणूक आर्थिक बाजूबरोबर एक मानसिक गोष्ट देखील आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर गुंतवणूक कोण करणार आहे त्याची मानसिकता, परिपक्वता आणि जोखीम पत्करण्याची क्षमता या घटकांवर अवलंबून आहे.
Arthay

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा