निवृत्त होण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतील हे कसे ठरवायचे?

याचे उत्तर काढण्यासाठी काही ठोकताळे लावू शकता किंवा अगदी शास्त्रोक्त पद्धतीने देखील उत्तर मिळू शकते.
आपण सूत्रांच्या आधारे आकडेमोडच करूया.
एक उदाहरण घेऊ. शशी आज ३५ वर्षाचा आहे. त्याची पत्नी सोनल ३२ वर्षाची आहे. या दाम्पत्याला शशीच्या ५५ व्या वर्षी निवृत्त व्हायचे आहे. त्याला बायकोसोबत निवृत्त जीवन जगायचे असेल तर महिन्याचे ४० हजार आजच्या घडीला पुरेसे वाटतायेत.
वार्षिक महागाई वाढीचा दर ६% पकडला.
२० वर्षानंतर आजच्या ४० हजारा एवढी रक्कम किती असेल ते पहिले काढूया.
२० वर्षानंतर महिन्याला लागणारी रक्कम = ४००००*(१ + महागाई वाढीचा दर ) ^ निवृत्तीसाठी राहिलेली वर्षे
२० वर्षानंतर महिन्याला लागणारी रक्कम = ४००००*(१ + ६% ) ^ २०
२० वर्षानंतर महिन्याला लागणारी रक्कम = १,२८,२८५
म्हणजे आज जे ४० हजारांमध्ये घर चालू शकते असे शशी-सोनल ला वाटते, तोच संसार चालवायला २० वर्षांनी शशी आणि सोनल ला १ लाख २८ हजार रुपये लागणार आहेत.
आता दुसर्या पायरीकडे वळूया.
२० वर्षांनी शशी-सोनल ला दरमहा १ लाख २८ हजार रुपये लागणार असतील, तर त्यांच्याकडे त्यावेळी किती रक्कम जमा असली पाहिजे?
ही २० वर्षांनंतर लागणारी निवृत्तीची रक्कम काढण्यासाठी आपल्याला खालील गोष्टी माहिती करून घ्याव्या लागतील किंवा गृहीत धराव्या लागतील.
१. दरमहा किती रक्कम हवी? (१ लाख २८ हजार)
२. महागाईचा दर किती असेल? (आताएवढा ६%च असेल असे मानू)
३. त्यावेळी त्याच्या निवृत्ती रकमेवर किती व्याज अपेक्षित आहे? (हे दोघे ती निवृत्तीची रक्कम निजोखमी ८% व्याजाने गुंतवणूक करणार असे मानू)
४. त्यांना किती कालावधी साठी ही रक्कम मिळणे अपेक्षित आहे? (दोघांचे अपेक्षित आयुष्य ८५ वर्षाचे मानले, तर त्यांना ही रक्कम ३३ वर्षे मिळायला हवी. सोनल शशीनंतर ३ वर्षे जगणार आहे)
गूगल शीट किंवा मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये PV या सूत्रामध्ये हे आकडे टाकले तर आपल्याला खालील रक्कम मिळते -
निवृत्तीच्या दिवशी किती रक्कम हवी = PV (महागाईला विचारात घेऊन म्हणजे adjusted दरमहा परताव्याचा दर, किती महिने ही रक्कम हवी, दरमहा हवी असलेली रक्कम, किती रक्कम सोडून जाणार, महिन्याच्या सुरुवातीला हवी आहे का?)
निवृत्तीच्या दिवशी किती रक्कम हवी = PV (१.८९%/१२, ३३*१२, १,२८,०००, ०, १)
निवृत्तीच्या दिवशी किती रक्कम हवी = ३ कोटी ७८ लाख रुपये
म्हणजे शशी-सोनल कडे निवृत्तीच्या दिवशी (शशीच्या ५५ व्या वर्षी) ३ कोटी ७८ लाख रुपये असतील तर ते त्यांच्या सध्याच्या राहणीमानासारखे पुढची ३३ वर्षे काढू शकतात.
सोनल ८५ व्या वर्षी जग सोडून जाताना तिची शेवटची पेन्शनची रक्कम असेल पावणेनऊ लाख रुपये.
(५० वर्षानंतरचे ४० हजार).
त्यानंतर या ३ कोटी ७८ लाख रकमेपैकी काहीही शिल्लक राहणार नाही.
समजा हे पतिपत्नी ८५ वर्षाच्या पुढे जगले तर मात्र तिला त्यानंतर पुढच्या जगण्यासाठी त्यांना काहीतरी दुसरी सोय करावी लागणार.
आता सर्वात महत्वाचा प्रश्न उरतो.
वयाच्या ५५व्या वर्षी ३ कोटी ७८ लाख रुपये जमा करण्यासाठी शशीला दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
हे पाहण्यासाठी खालील गोष्टी विचारात घेऊ -
१. गुंतवणुकीवर किती परतावा अपेक्षित आहे? - १२% (समजा शशीने समंजसपणे गुंतवणूक केली, आणि त्याला हा वाजवी परतावा मिळाला)
२. गुंतवणुकीसाठी उपलब्ध कालावधी - २० वर्षे
आता गूगल शीट किंवा मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील PMT सूत्र वापरून आपल्याला ही रक्कम काढता येईल.
दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल = PMT (१२%/१२, २०*१२,,३७८०००००)
दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल =३७८८५
म्हणजे शशीने आतापासून दरमहा जवळ जवळ अडतीस हजार गुंतवले तर त्याला त्याच्या सध्याच्या राहणीमानासारखे जीवन वयाच्या ५५ व्या वर्षांनंतर निवृत्त होऊन जगता येईल.
त्याच्याकडे आधीच काही गुंतवणूक असेल, समजा १० लाख असतील तर हीच दरमहा रक्कम दरमहा सत्तावीस हजार रुपये इतकी खाली येईल. आणि जर शशी ने ६० वर्षानंतर निवृत्ती घ्यायची ठरवली, तर हीच रक्कम दरमहा ११ हजार रुपये इतकी खाली येऊ शकेल.
आता खालील कोष्टकात सध्याचे वय, निवृत्तीचे वय, सध्या आधीच केलेली गुंतवणूक, निवृत्तीनंतरचे राहणीमानासाठी अपेक्षित खर्च, गुंतवणुकीवरचा परतावा या संख्या बदलल्या तर काय होते याचे अनुमान दिले आहेत. तुमच्या विशिष्ट केस साठीचे कॅल्क्युलेटर मी माझ्या वेबसाईटवर अथवा गुगल फॉर्म द्वारे शेयर करीन. त्यासाठी मला माझ्या प्रोफाईलवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सऍप करा.

परताव्याचे /महागाईचे टक्के प्रातिनिधिक उदाहरण म्हणून अभ्यासासाठी दिले आहेत. हा गुंतवणूक सल्ला नाही.
वरील कोष्टक बारकाईने पाहिले तर चाणाक्ष लोकांना गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्याचे टक्के, वेळ, आणि सुरुवातीची गुंतवणूक किती महत्वाचे आहे हे लक्षात येईल. दरवर्षी गुंतवणूक वाढवत नेली तरी खूप चांगला फरक पडतो. या सारणीत त्याचा प्रभाव विचारात घेतलेला नाही. निवृत्तीच्या काळात एक्सट्रा उत्पन्न देणाऱ्या मालमत्ता जसे भाड्याने दिलेली स्थावर मालमत्ता, शेयर्स वर मिळणारे डिव्हिडंडस कसे तुमच्या निवृत्तीला हातभार लावू शकतात हेही समजते. एफडी पेक्षा जास्त परतावा देणारे इक्विटी पर्याय आपल्या गुंतवणुकीचा भाग का असावेत याचेही उत्तर मिळेल.
अशा पद्धतीने सरळ सरळ निवृत्तीसाठी प्लॅन तयार करता येतो. आणखी घटक व्यक्ती-कुटुंबपरत्वे बदलतात. त्यासाठी मग आर्थिक सल्लागार / जाणकार व्यक्तींसोबत चर्चा केली तर तुम्ही चांगल्या प्रकारे नियोजन करू शकता. मी एक सेबी प्रमाणित म्यूचुयल फंड वितरक आहे. आर्थिक योजना तयार करण्यासाठी माझ्याशी संपर्क करू शकता.
© https://www.arthay.com/

----

तिसरी पायरी आता सर्वात महत्वाचा प्रश्न उरतो.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा