पोस्ट्स

जुलै ३१, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

LIC पॉलिसीज मध्ये फसवणूक होते का?

इमेज
एलआयसी वितरक ही एक प्रातिनिधिक उदाहरण मानू. खरेतर कोणत्याही कंपनीच्या मग म्युच्युअल फंड्स का असेना, त्या स्कीमची आणि ती विकून त्यात तुम्हाला पडणाऱ्या फीची, त्यातल्या जोखीमीची, वास्तविक परताव्याची आणि त्या वितरकाला होणाऱ्या नफ्याची माहिती उघड केली नाही तर ती फसवणूकच म्हणायची. एलआयसी वितरक बदनाम आहेत कारण ते सर्वपरिचित आहेत आणि बरीच वर्षे हा व्यवसाय चालू आहे म्हणून. आणि चांगले एजंट देखील आहेत. पण त्यांना ओळखण्यासाठी तुम्हाला तेवढे ज्ञान हवे ना. खालील लेख पूर्ण वाचा. मी LIC वर टीका जरी केली आहे तरी शेवटी त्यांच्यातर्फे बॅटिंग देखील केली आहे. तर एलआयसी एजंट फसवतात म्हणजे नक्की काय? ते आपल्या अज्ञानाचा फायदा घेतात. आपल्याला अज्ञान नसेल तर कसेकाय फसवणार? म्हणून जोपर्यंत तुम्हाला एलआयसी, म्युच्युअल फंड्स, डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या गोष्टी कळत नाहीत आणि योग्य प्रश्न विचारता येत नाहीत, तोपर्यंतचांगल्या बँकेत एफडी करा आणि शांत राहा. थोडे पैसे आर्थिक ज्ञान मिळवण्यावर खर्च करा. थोडे आर्थिक ज्ञान वाढले कि यात आता स्वतःचा "टर्म इन्शुरन्स" काढा आणि परत शांत राहा. आणखी थोडे आर्थिक ज्ञान वाढ...