पॉन्झी स्कीमचे वास्तव
तुम्ही कोणता सर्वात मोलाचा आर्थिक सल्ला देऊ शकता?
नेटफ्लिक्स वर "मॅडॉफ" नावाची डॉक्युमेंट्री आहे. अमेरिकेत बर्नी मॅडॉफ नावाच्या एका इंवेस्टमेंट बँकर ने २५-३० वर्षे एक हेज फंड चालवला जो नियमितपणे त्याच्या गुंतवणूकदारांना १५-२० टक्के परतावा देत होता.

२००८ मध्ये या इसमाने स्वतः सरकारी एजन्सीस समोर समर्पण करून सांगितले की इतकी वर्ष तो एक पाँझी स्कीम चालवत होता. म्हणजे गुंतवणुक दारांच्या पैशाची गुंतवणूक कधी झालीच नाही. नवीन आलेल्या पैशाने जुन्या गुंतवणूकदारांना परतावा दिला जात होता.
या माणसाने हुशार लोकांना पदरी ठेवून सगळे नियम व्यवस्थित मॅनेज केले. त्याच्या माणसांनी अशी सॉफ्टवेअर बनवली होती जे शेयर्स चे महिनाभरापूर्वीचे भाव निवडून त्याला पाहिजे तसे रिटर्न देणारे ट्रेड कागदावर छापून द्यायचे. त्यामुळे ज्यावेळी स्कृटीनी आल्या त्यावेळी याने सगळे कागद तंतोतंत जुळवले. असा हा सगळा खेळ त्याने तब्बल २५-३० वर्ष चालवला. काही मोठ्या गुंतवणूकदारांना तर या गोष्टीची पूर्ण कल्पना होती. तरीही "जब तक गंगा बह रही है, हाथ धोलो" या न्यायाने त्यांनी देखील कोट्यवधी डॉलर्स कमावले.
शेवटी २००८ च्या मंदिमध्ये आता म्हातारा होऊन थकलेल्या बर्नी मॅडॉफने स्वतःच हा खेळ संपवला. गंमत बघा हा इसम वॉलस्ट्रीट वरचा बाप माणूस, त्याची मोठी पत म्हणून ४० वर्ष उजळ माथ्याने वावरला. स्वतःच्या मुलांना दुसरे कामधंदे देऊन कायद्याची कुऱ्हाड त्यांच्यावर कोसळणार नाही अशी सोय केली.
काही प्रतिस्पर्धी हेज फंड कंपन्यांनी त्यांचे सर्वात हुशार गणितज्ञ बसवले. त्या गणित तज्ञांनी कितीही डोकेफोड केली तरी त्यांना एवढा परतावा काढणे जमले नाही. शेवटी त्यातल्याच काहींनी हे १५-२० टक्के सातत्याने येणारे रिटर्न कसे शक्यच नाहीत हे पुराव्यानिशी वारंवार सिद्ध केले. तरी देखील SEC ने हा फुगा आपोआप फुटेपर्यंत थातूरमातूर चौकशांपलिकडे काहीच केले नाही.
हा सगळा मामला बाहेर आला तेव्हा जवळजवळ ६२ अब्ज डॉलर्सचा घोळ झाला होता. बर्नी तुरुंगात गेला, त्याच्या कुटुंबाची वाताहत झाली पण त्याच्या गुंतवणूक दारांची चांगलीच लागली. त्यातल्या त्यात एक गोष्ट चांगली झाली जी अमेरिकेतच होऊ शकते.
सरकारने कोट्यवधी डॉलर्स खर्च करून एक कमिटी बसवली ज्या कमिटीने काही वर्षातच सगळा हिशोब मांडला. ज्या गुंतवणूक दारांनी बर्नीच्या या फंडात नेट सरप्लस कमावले त्यांच्याकडून पैसे वसूल करून ज्यांना नेट नुकसान झाले त्यांना ते देण्यात आले आणि हिशोब चुकते केले गेले. पण अशा न्यायामुळे म्हातारपणी काहींच्या प्रॉपर्टीज विकल्या गेल्या. सरतेशेवटी २०२० पर्यंत १६-१७ अब्ज डॉलर्स सेटल केले गेले.
सांगायचा मुद्दा असा की स्कीम चालवायची तर चालवता येऊ शकते. बर्नी मॅडॉफ सारखा मेंदू आणि दम पाहिजे. आणि परिणामांची तयारी ठेवली पाहिजे. आणि असे असतात. त्यातले १० मधले ५ त्यांच्या गुंतवणूकदारांसह सहिसलामत पार होतात. ३ जण पैसे पचवून पसार होतात. २ जण कायद्याच्या कचाट्यात सापडतात. गुंतवूकदार हुशार असेल तर असल्या स्कीम च्या सुरुवातीलाच पैसे कमावून फुगा फुटायच्या आधीच त्यातून काढता पाय घेतो. भाबडी मंडळी येतातच उशिरा आणि अडकतात.
मला वाटते नैतिक अनैकतिकतेच्या गोष्टी एकवेळ बाजूला ठेवल्या तर या स्कीम मध्ये पैसा नक्की कसा तयार होतोय याची माहिती घेऊन स्मार्ट पद्धतीने आत बाहेर करणाऱ्या लोकांची खरेतर दादच द्यायला हवी. (बर्नी च्या केस मध्ये गुंतवणूक दारांना न्याय द्यायला जो वाघ ऑडिटर-ट्रस्टी आला तसा आला तर या लोकांचेही हिशोब निघतात, पण असा ट्रस्टी विरळा)
"हे रिटर्न तयार होतात कसे, फुगा कधी फुटायला आलाय, चक्रव्यूहातून बाहेर कधी यायचे, नाही येता आले तर पैसे गेले तर चालतील का?" हे माहिती नसेल किंवा करून घ्यायचे नसेल तर मार्केट पेक्षा असामान्य रिटर्न देणाऱ्या अशा "खात्रीशीर" स्कीम्स पासून दोन हात लांब राहणे उत्तम. "यात्रिगण ध्यान दे, ऐसी यात्रा मे आप शिकारी नही, शिकार हो".
नेहमी एखाद्या सक्षम आर्थिक सल्लागाराला तरी विचारावे. होतं काय की श्रीमंत लोक, ज्यांना पैशाची जनरली चांगली अक्कल असते ते आर्थिक सल्लागारांना विचारून, त्यांना गेली तरी परवडेल एवढीच रक्कम गुंतवून त्यांचे डावपेच खेळतात आणि गरीब आधीच फाटक्यात पाय असून सल्लागाराला द्यावे लागणारे पैसे वाचवतात पण स्वतःचे स्वतः नुकसान करून घेतात. दर साल दर शेकडा परतावा कसा काढायचा हेपण माहीत नसते आणि संचयनी झाले कि मैत्रेय, ते झाले की पॅन कार्ड अशा घोटाळ्यात अडकतात. वर अशाच लोकांचा शेयर बाजार म्हणजे जुगार असा सरसकट समज असतो. आणि तो बदलण्याची मानसिकता देखील नसते. कारण परत अभ्यास येतो ना. म्हणजे अज्ञानापायी दुहेरी नुकसान करून घेतात.
सो सल्ला हाच राहील की पैसे नसले तरी ज्ञान तर फ्री आहे. चला एकवेळ हे मान्य केले कि काही अनुभवाचे ज्ञान जास्त पैसे असतील तरच मिळते. पण १०० टक्के तरी नाही ८० टक्के तरी वाचन, आणि सल्लागार शोधून किरकोळ खर्च करून मिळू शकते.

----

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा