पोस्ट्स

जुलै १६, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कॅलिफोर्निया गोल्ड रश आणि स्टॉक मार्केट क्लासेस

इमेज
शेअर बाजारातील तज्ज्ञ मंडळी स्वत: जर मार्केटमधून भरपूर पैसे मिळवत असतील तर ते प्रशिक्षण अभ्यासक्रम (ट्रेनिंग कोर्स) का काढतात? त्यांच्या वर्गामध्ये शिकलो तरी आपले मात्र नुकसान कसे काय होते? एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत कॅलिफोर्निया प्रांतात सोन्याचे साठे सापडले आणि हे सोने काढण्यासाठी, अल्पावधीत नफा कमवू पाहणाऱ्या स्वप्नाळू लोकांची संपूर्ण अमेरिकेतून तिथे झुंबड उडाली. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर खाणकाम चालू केल्यावर साहजिकच त्यातल्या काही लोकांचे नशीब उजळले आणि काही लोक तसेच खड्डे खणत बसले. इतिहासात हा कालखंड "गोल्ड रश" म्हणून ओळखला जातो. खड्डे खणून, माती चाळणारे सगळे श्रीमंत नाही झाले. मात्र या झुंबडीला काही चाणाक्ष लोक कुदळ, फावडे, घमेली, जीन्स विकत होते. ते मात्र हमखास श्रीमंत झाले. चित्र  विकिपीडिया  वरून साभार ---- भारतात दरवर्षी हजाराहून कमी क्लास १ पोस्ट भरल्या जातात. त्या हजार एक पोस्टच्या जागांसाठी दर वर्षी २०-४० लाखाहून अधिक मुले/मुली लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करतात. त्यातले लाखो जण पाण्यासारखा पैसा खर्च करून दिल्ली, कोटा अशा शहरात क्लास लावतात...