बिटकॉइन काय भानगड आहे?
बिटकॉइन अलिकडे इतके प्रसिद्ध का झाले?

बिटकॉइन ला अलीकडे महत्व का आले आहे हे समजून घ्यायचे असेल तर पहिल्यांदा सम्पत्ती म्हणजे काय, आणि चलन म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल. बिटकॉइन मागचे तंत्रज्ञान तूर्तास बाजूला ठेवू. तसेही ते आपल्याला एका बैठकीत समजणार नाहीये. त्याच्यावर सेपरेट पोस्ट करूया.
चला सुरुवात करू एका प्रश्नाने. कंटाळा करू नका. किमान २-५ मिनिटे विचार करून डोक्यात उत्तर तयार करा आणि मग पुढे निघा.
प्रश्न - पृथ्वीवर तयार होणाऱ्या संपत्तीचे स्रोत किती व कोणते?
. १ मि.
. २ मि.
. ३ मि.
झाला विचार करून?
मी पण केला होता.
उत्तर - पृथ्वीवर तयार होणाऱ्या संपत्तीचे स्रोत तीन.
सूर्य, भूमी, महासागर. या तीन गोष्टींमधूनच पृथ्वीवर नवीन संसाधने तयार होतात. आणि संसाधने म्हणजेच संपत्ती. म्हणजे सूर्यापासून, भूमीतून आणि महासागरातून ( शेती, खनिज, मासे, इ.) उत्त्पन्न घेणारेच फक्त संपत्ती तयार करत आहेत. ऑ.. मग आम्ही दिवसभर ऑफिसमध्ये, फॅक्टरीमध्ये राबून काय तयार करतो?
तुमच्या डोक्यात आणखी कितीही गोष्टी आल्या असल्या तरी त्या सर्वांचा स्रोत या तीन पैकीच असणार आहे. बाकी सबकुछ फक्त एकाकडे असलेली संपत्ती दुसऱ्याकडे हंस्तांतरित करण्याचे उद्योग आहेत. परत विचार करून बघा.
झाला विचार? काही शंका असतील तर असुदे. शांतपणे नंतर परत विचार करा. आता पुढे निघूया?
संपत्ती आणि चलन या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
वरचे वाक्य परत वाचा.
"असे कसे? माझ्या घरात असेलेले १० हजार रुपये संपत्तीच आहे ना?"
हो. आहे. पण मानलेली आहे.
कल्पना करा नोटबंदी पूर्वी कोमात गेलेला कोणी खडखडीत बरा होऊन घरी आला, आणि कुठल्यातरी गोपनीय ठिकाणी ठेवलेले लाखभर रुपयाची जुन्या नोटांची बंडले बाहेर काढली तर त्याची किंमत त्याच्यासाठी लाखभर रुपये असेल. पण तुम्हाआम्हासाठी किती?
"आता कसे बोललात. म्हणून आम्ही सोनं घेतो. सोनं म्हणजे खरी संप्पती."
सोनं म्हणजे खरी संप्पती? हो. आहे. पण मानलेली आहे.
"हे जरा जास्तच होतंय हा.."
थोडी कळ काढा. हे "मानलेली संपत्ती" काय प्रकरण आहे हे पुढे समजेल.
आपण आता हजारो वर्षांपूर्वी जाऊया. एका कोकणातल्या गावात आपले पूर्वज राहत आहेत. निळू आणि काळू. निळू मासेमारी करतो. काळू भात पिकवतो. निळू रोज एक किलो तांदूळ त्याच्या कुटुंबासाठी काळूकडून आणतो. आणि त्या बदल्यात काळूला १ किलो मासे देतो. आता १ एका किलो तांदळाला एक किलो मासे का? ठरवले त्यांनी त्यांच्या त्यांच्यात. अजून गावात बाजारपेठच नाही. त्यामुळे तांदूळ आणि माशाचा भाव ठरवणारे हे दोघेच.
काळू बक्कळ शेती करून धान्य साठवून ठेवतो. सहा महिने आराम करतो. निळूला बिचार्याला रोज मासेमारी करायला जावेच लागते. मासे साठवून ठेवता येत नाहीत ना.. खराब होतात. निळूला वाटते हा काय शहाणपणा आहे. मासे पण असे साठवण्याजोगे असायला पाहिजे होते. पण नाहीयेत ना. हि खंत तो काळूला बोलून दाखवतो. काळूपण समजूतदार असतो. "उद्यापासून मी तुला १ किलो माशाच्या बदल्यात २ किलो तांदूळ देईल. मग तर झाले?" निळूला आनंद होतो. तो म्हणतो "तसे झाले तर मी ३० किलो तांदूळ देऊन महिन्याभरात चंदू सुताराकडून माझी होडी दुरुस्त करून घेईन."
इथे साठवून ठेवण्याजोग्या संपत्तीचा जन्म आहे. आणि चलनाचा देखील. तांदुळरूपी चलन हीच संपत्ती आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा.
काही दिवसांनी काळूला दुसऱ्या गावामधून एक गाय आणायची असते. दुसऱ्या गावातला शेतकरी गायीच्या बदल्यात २० पोती तांदूळ मागत असतो. आता २० पोती लादून पावसापाण्याचे एवढे लांब जायचे? त्याच गावातला मंगू लोहार काळूला सांगतो अरे, एवढी पोती घेऊन जाण्यापेक्षा हीच पोती तुझ्या शेजारच्या पाटलाकडे दे. त्याच्याकडून १ तोळा सोने घे.
" 'सोने?' ते काय असते. आणि २० पोती तांदूळ देऊन हाताच्या बोटावर मावेल एवढी वस्तू का घेऊ मी?" इति काळू.
मंगू जरा पंचक्रोशीत फिरलेला माणूस असतो. मंगू म्हणतो, "अरे, काळू… सोनं हा नवीन प्रकार आला आहे आपल्या जगात. असतं ते लोखंडासारखंच. पण दिसायला चकचकीत.. फार गोंडस. आणि उन्हापावसात कसेही ठेवलं तरी त्याला काहीच होत नाही."
काळू पाटलाच्या घरी जातो. २० पोत्याच्या बदल्यात १ तोळा ते सोनं का काय घेतो. हे तो गाय विकणारा शेतकरी घेईल ना, अशी त्याची शंका असते. पाटील त्याला सांगतो कि "त्या गाय वाल्या शेतकऱ्याच्या गावातला पाटील त्याला २० पोटी तांदूळ देईल या सोन्याच्या बदल्यात. नाही दिले तर परत आन, मी तुझी २० पोती परत देईल तुला. मग तर झालं?"
पाटलाच्या या आश्वासनामुळे काळू निर्धास्त होतो आणि ते इतकूसं सोनं घेऊन सकाळी जाऊन संध्याकाळ पर्यंत गाय घेऊनही येतो.
इथे चलनाचा जन्म आहे. सोनं हे संपत्ती हंस्तांतरित करणायची एक चतुर पद्धत आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा.
"अरे मंगू, काय उपाय सांगितला रे तू. खरंच सोन्यामुळे माझी एवढी मेहनत वाचली. शिवाय पावसापाण्याची भीती नव्हती. पण पाटलानं सोनं कुठून आणलं? आणि त्याच्याकडं नक्की आहे किती? त्याच्याकडं आलं कुठून?"
मंगू सांगतो - "पाटील मोठा माणूस आहे, सगळीकडं फिरतो. मोठ्या माणसात उठबस आहे. राजाच्या दरबारात हाजिरी आहे. त्यांनी त्यांनी ठरवलं एका बैठकीत कि मोठ्या व्यवहारासाठी एवढे तांदूळ देणे घेणे आता जिकरीचे आहे. त्यामुळे सोनं वापरायचं ठरलं. खरा सोन्याचा स्टॉक आहे राजाकडं; आणि राजाची लोकच ठरवत्यात एका तोळ्याच्या बदल्यात किती धान्य द्यायचे ते"
काळू म्हणतो - "आरं मग राजा तर कितीही धान्य घेऊ शकतो. त्याच्याकडं तर डोंगर असल सोन्याचा."
मंगू म्हणतो - "आसल किंवा नसल, पण आपलं तर काम होतंय ना."
पाटील हे बोलणं ऐकत असतो.
पाटील सांगतो - "आरं सोनं राजाकडं पण मर्यादितच आहे. सोनं हा धातू आहे. तो मिळवणं सोपं नाही. आणि राजानं पण खास व्यवहारासाठी ठेवलं हाय. तो काय उगीचच आहे म्हणून वापरणार नाही. असं केलं तर सगळ्यांकडं बक्कळ सोनं ठेऊन त्या सोन्याची किंमत कोण करल?"
मंगू - "पण पाटील सोनं व्यवहारासाठी आहे तर वहिनी गळ्यात सोनं घालून का फ़िरत्यात"
पाटील - "ती फ्याशन आहे. ज्यांना गळ्यात घालायचंय हातात घालायचंय घालूद्या. २० पोती तांदूळ द्या आणि तुम्ही पण सोन्याचे दागिने घाला. जेव्हा त्याबदल्यात धान्य पाहिजे, मासे पाहिजेत तेव्हा ते दागिने द्या. कोण नाही म्हणतंय."
काही दिवसांनी राजाच्या दरबारात पाटील आणि राजेसाहेब भेटतात.
पाटील - "महाराज, हे नवीन सोन्याचे व्यवहारामुळे प्रजा खुश आहे. प्रत्येक वेळी वस्तूला वस्तू देणे घेणे अवघड होते. एखाद्याकडे तांदूळ असतील आणि दुसऱ्याकडे मेंढ्या असतील आणि मेंढीवाल्याला तांदूळ नको असतील तर व्यवहार होत नव्हता. आता तांदूळ वाला मोठ्या बाजारपेठेत जातो. तांदूळ विकून सोनं घेतो. ते सोनं मेंढीवाल्याला देऊन मेंढ्या घेतो. नंतर तेच सोनं घेऊन मेंढीवला त्याला बाजारपेठेतून लागतं ते खरेदी करतो. सगळ्यांचीच सोय. काही जणांकडे आलेलं एक्सट्रा सोनं ते दागिने म्हणून वापरतायेत. तिजोऱ्यांमध्ये ठेवतात. त्याने काही प्रॉब्लेम नाही ना?"
महाराज - "सध्या तरी काही प्रॉब्लेम नाही. ज्यांना वापरायचं त्यांना वापरूद्या. आपल्या बाजारपेठेत वस्तूंच्या किंमती सांभाळण्यासाठी लागणारे सोने आपण देऊ"
पाटील - "पण महाराज एक प्रॉब्लेम आहे. काही जण त्यांच्याकडच्या सोन्यामध्ये भेसळ करतात. सगळ्यांना ते ओळखता येत नाही. लबाडी करणार्याचा फायचा होतो. निष्कपट नागरिकांचे नुकसान होते."
महाराज - "हा प्रॉब्लेम लक्षात आला आमच्या. म्हणूनच आपल्या अर्थ खात्याने आता चामड्याच्या आणि कागदाच्या नोटा आणल्या आहेत. त्याला आपण रुपये म्हणू आणि १००० रुपये म्हणजे १ तोळा मानू. चामड्याचा आणि कागदात तर कोणी भेसळ करणार नाही ना. त्या नोटांवर आपली राजमुद्रा असेल. जो राजमुद्रेची कॉपी करेल त्याला देहांत शासन देऊ."
पाटील - "आयडिया चांगली आहे महाराज. त्यामुळे लोक फक्त व्यवहारासाठी चलन वापरतील आणि दागदागिने, हौसेसाठी सोनं आहेच. पण हे रुपये किती छापायचे हे कसे ठरवणार महाराज?"
महाराज - "सध्यातरी आम्ही ठरवलंय कि जेवढं सोनं खजिन्यात आहे तेवढ्या किमतीचेच रुपये छापू. हे कागदी रुपये म्हणजे खजिनातल्या अस्सल सोन्याचं प्रतिबिंब असेल. भविष्यात आणखी नवीन काही सुचले तर कळवू. ते सोडा आमच्या अर्थखात्यावर" हसून पाटलाच्या खांद्यावर हात ठेवतात.
इथे पेपर करन्सी चा जन्म आहे. हा पॉईंट लक्षात घ्या.
या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला लक्षात आले असेल कि खरी संपत्ती संसाधने आहेत. पैसे म्हणजे - चलन ती संसाधने एकाकडून दुसरीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग आहेत. आणि संपत्तीचा साठा करण्यासाठी देखील चलन वापरले जाते. पण त्या चलनाला जोपर्यंत समाजमान्यता आहे तोपर्यंत.
मग आतापर्यंत हे सगळे चांगले चालले होते की.. बिटकॉइन कुठून आला?
मंगूने लोहाराने काळूला जसे सोन्याबद्दल सांगितले, तसेच या शतकात बिटकॉइनचा उदय झाला. सोन्याचे गुणधर्म जसे - दुर्मिळपणा, टिकाऊपणा हा बिटकॉइन ची पण वशिष्टये आहेत. बिटकॉइन हा एक कॉम्प्युटर वर तयार झालेले संकेत आहेत. ते एकदा तयार झाले की परत तयार होत नाहीत. जे तयार झालेले आहेत ते जगातील हजारो कॉम्प्युटर्स वर व्हॅलिडेट करता येतात. तळहातावर मावेल एवढ्या डिस्क मध्ये जगाची पूर्ण संपत्ती बिटकॉइनरुपी संकेतांमध्ये साठवता येऊ शकते. सोने जसे भूगर्भातून मिळतच आहे, मिळतच आहे, तसे बिटकॉइन चे होणार नाही. एका ठराविक मर्यादेनंतर हे संकेत तयार होणे बंद होणार. कारण त्याचे अल्गोरिदमच तसे आहेत.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मान्यता. काळू ने जसे पाटलावर भरोसा ठेवून त्याच्याकडून २० पोत्याच्या बदल्यात सोनं घेतलं, तसेच बिटकॉइनच्या बदल्यात संसाधने किंवा प्रचलित चलन देणारे जगात आहेत आणि त्यांची संख्या गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. त्यामुळे काहीजण सोन्यासारखा बिकॉइन चा साठा करत आहेत.
बिटकॉइन चा टेक्निकल भाग समजून घेण्याची सामान्यांना गरजच नाही कारण तसे पहिले तर सोने टेक्निकली कोणाला समजले आहे? नाही म्हणजे ते तयार कुठे होते, त्याच्या अणुरेणुची रचना कशी हे बोटावर मोजण्याएवढ्याच लोकांना माहिती असणार ना, त्याने सोन्याची समाजमान्यता कमी होत नाही.
असे असेल तर मग सोन्याचे काय होणार? काही नाही होणार. सूर्य, भूमी आणि महासागरातून तयार होणारी संपत्तीचं दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे त्या संपत्तीचे मूल्य सोयीस्कर पद्धतीने साठवून ठेवेतील अशी साधने मानवजातीला लागणारच आहेत. सोनं आहे तरी चांदी आहे, हिरे आहेत, प्लॅटिनम आहे, कंपन्यांचे शेयर्स आहेत, पेटंट आहेत, रुपये आहेत डॉलर्स आहेत आणि जमीन देखील आहे. तसेच, जगात मूल्य आणि संपत्ती स्टोअर करण्यासाठी एकापेक्षा जास्त कल्पक वस्तू वापरात येऊ शकतात. आहो लोक दुर्मिळ चित्रे देखील संपत्तीचा साठा करण्यासाठी वापरतात. त्यामुळे सगळे सोडून बिटकॉइन च्या मागे लागण्यात पॉईंट नाही. कारण सोन्याला समाजमान्यता मिळण्यासाठी किती वर्षे लागली ते आपल्याला माहीत नाही. तसेच बिटकॉइन ला संपूर्ण मान्यता मिळून ते चलन अथवा मूल्यसाठा करण्याचे माध्यम म्हणून मान्य पावण्यासाठी देखील बरेच अडथळे आहेत. सर्वात मोठा अडथळा अमेरिकेचा डॉलर आहे. का ते नंतर कधीतरी बघू. आणि बिटकॉइनचे नवीन भाऊबंद आल्टकॉईन्स देखील दिवसाला डझनभर तयार होत आहेत. त्यांच्या किमतीतील तात्कालिक उतार चढावातून लोक पैसे कमावत आहेत पण जर तुम्ही अतिश्रीमंत कॅटेगरी मधले नसाल तर या खेळापासून दूर राहणे उत्तम. हा जर बिटकॉइन खरंच फोफावला तर मात्र त्यावेळी ज्यांच्याकडे आहेत त्यांची राजा आणि पाटलासारखी चांदी होईल. निळू, काळू आणि मंगूला आश्चर्य वाटेल. एवढेच. बाकी जग चालायचे तसे चालणारच आहे.
एवढाच FOMO येत असेल तर जगात सर्वात जास्त खणखणीत चालणारं नाणं म्हणजे स्वतःच्या ज्ञान आणि कौशल्यावर गुंतवणूक करा. (हे वाक्य म्हणजे फक्त एक डायलॉग मारला आहे. chatGPT सारख्या AI मुळे कोणती कौशल्य आणि कोणते ज्ञान पुढे उपयोगाला येईल हे मलाही माहीत नाही. 😉)
मागे वाचलेल्या "एका तेलियाने" या पुस्तकात सौदीचे दीर्घकाळ अर्थमंत्री राहिलेले झाकी यमानी यांचे एक वाक्य आहे - "दगड धोंड्यांच्या अभावामुळे अश्मयुग संपले नाही, तसेच तेलाचे युग देखील तेलाच्या अभावामुळे संपणार नाही."
याचा अर्थ लक्षात घ्या. नवीन तंत्रज्ञान येते तेव्हा जुन्या पद्धती न संपता त्यांचे महत्त्व लक्षणीय रित्या कमी होते. ही प्रक्रिया हळूहळू होते. पण आताच्या तंत्रज्ञानाचा वेग पाहता हे बदल नक्कीच हळूहळू होणार नाहीत. संगणक युगात संगणकाधारित चलन आणि संपत्ती साठवणुकीची माध्यमे येतील ही अपरिहार्यता आहे. ज्यांना शक्य असते असे लोक नवीन युगाची नांदी होतानाच जोखीम घेऊन तयारी करतात. या जोखिमी फायद्याच्या ठरतात का नुकसानीच्या हे तर काळच ठरवतो.

----

Quora.com वरील माझे मूळ उत्तर - https://qr.ae/prfuss
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा