म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीची सुरुवात

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची असेल, तर कमीत कमी किती रक्कमेपासून सुरूवात करावी लागते? आणि ती कशी करायची, या बद्दल मराठी कोरावरील कोणी जाणकार मार्गदर्शन करू शकतील का?





मी स्वतः एक गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर आहे.

"म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करणे सोपे आहे", "डायरेक्ट ऍप वगैरे वापरून करू शकता" या गोष्टी ज्यांना या विषयाची आधीपासूनच जाण आहे अशा लोकांना सोप्या वाटतात.

माझ्या मते जर सुरुवातच करायची असेल तर चांगला मार्गदर्शक बघून करावी. कारण एखाद्या बँकेत एफडी करून दर वर्षी ७ ते ८% व्याज मिळवण्याइतकी इक्विटी मार्केट्स मध्ये गुंतवणूक सोपी नाही. मला विचाराल तर गुंतवणूक ही आर्थिक बाजूबरोबरच एक मानसिक गोष्ट देखील आहे.

----

गेल्या वर्ष दीड वर्षात ९५% म्युच्युअल फंड्स चा परतावा एफ डी पेक्षा कितीतरी कमी आहे आणि काहींच्या बाबतीत तर मायनस मध्ये गेलेला आहे. अशा वेळी आधीच्या वर्षी मिळालेले १२-१५ टक्के परताव्याचे आकडे बघून गुंतवणूक करणारे, जर कोणी मार्गदर्शक नसेल, तर आपापली गुंतवणूक काढून घेतात किंवा नुकसान सोसून सरळ एफडी चा मार्ग शोधतात. यात चूक बरोबर काहीच नाही. पण सगळे परिस्थितीवर अवलंबून आहे.

त्यामुळे कोणी त्या विषयातील जाणकार, मग तो मित्र, सल्लगार, पुस्तके किंवा स्वानुभव का असेना बरोबर असेल तर अशा वेळी सावधपणे वाटचाल चालू ठेवता येते.

"स्वतःचे स्वतः करू" या मानसिकतेतून पहिले तर बराच वेळ निघून जातो. आणि नेमके ज्यावेळी इक्विटी मार्केट्स वर जाऊन महाग झालेले असतात, सगळीकडे बोलबाला असतो अशा वेळी गुंतवणूक केली जाते. पुढील काही महिने काहीच परतावा मिळत नाही किंवा गुंतवणुकीची मूल्य खाली देखील जाते तेव्हा मग "एफडी काय वाईट आहे" सुचायला लागते.

----

एका उत्तरात समजून देता येईल असा हा विषय नाही. सावधपणे छोटी गुंतवणूक चालू करून, पाण्याचा अंदाज येईल तसे वाढवत न्यावी असे माझे मत बनले आहे. सुरुवात एसआयपी पासून करणे चांगले धोरण आहे. या विषयाशी संबंधित माझी आधीची उत्तरे पाहू शकता किंवा माझ्याशी बोलू शकता. माझ्या प्रोफाइल मध्ये माहिती दिली आहे.

टिप्पण्या

Popular Articles on This Site

मुलांच्या शिक्षणाची तरतूद

निवृत्त होण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतील हे कसे ठरवायचे?

इन्शुरन्स श्रेष्ठ दान