पैशाला पैसा ओढतो की कष्टाने पैसा येतो?
९० च्या दशकातली एक मालिका आठवते का? त्यात एक श्रीमंत कॅरॅक्टर असते. काही कारणासाठी स्वतःला मुद्दाम तोटा व्हावा असे काहीतरी करत असते. प्रत्येक वेळी कितीही वाईट गुंतवणूक केली तरी त्याला फायदाच होत असतो. एका एपिसोड मध्ये हा अतिश्रीमंत एका टुकार चित्रपट दिग्दर्शकाला चिकार पैसे देऊन सिनेमा काढायला सांगतो. कयास हाच असतो कि नेहमीप्रमाणे तो दिग्दर्शक वाईट चित्रपट तयार करून तो नक्की नुकसान करणार. पण सिनेमा एवढा वाईट असतो कि प्रेक्षक तो एन्जॉय करतात. आणि हा वाईट चित्रपट देखील तुफान हिट होतो. या अतिश्रीमंत माणसाचे नुकसान होणे दूर, त्याला आणखी पैसे मिळून तो अधिक श्रीमंत होतो. असे बरेच विनोदी किस्से या मालिकेत होते. (कुणाला मालिकेचे नाव आठवले तर सांगा) जोखीम वरील मालिकेची या प्रश्नाच्या निमित्ताने आठवण झाली. पैसा पैशाला ओढतो कारण ज्यांच्याकडे जास्त पैसा असतो त्यांची जोखीम घेण्याची ताकद जास्त असते. ज्याच्याकडे ४-५ कोटी आहेत तो ५० लाखाचा फ्लॅट आरामात घेऊन वर्षभराने ७० लाखाला विकून १०-१५ लाखाचा नफा पदरात पाडू शकतो. किंवा एखाद्या बेभरवशाच्या स्टॉक वर १० लाख लावून त्याचे १ कोटी करू शकतो. त्या १० लाखाचे...